खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंग देवस्थानचे दर्शन घेऊन मंदिरच्या परिसराला भेट दिली. मात्र मंदिर परिसर आणि नदीपात्रातील कचरा पाहून परिसर स्वच्छ करण्याचे ठरले लागलीच विद्यार्थी स्वच्छतेच्या कामाला लागले. नुकताच मकरसंक्रांतीच्या सनात भाविकांनी टाकलेल्या नदीपत्रात प्लास्टिक, देवांच्या तस्वीरी, निर्माल्य अनेक प्रकारचा कचरा जमा करून दूरवर असणाऱ्या खड्ड्यात टाकण्यात आला. देवांच्या तस्वीरी एकत्र करून रचण्यात आल्या. तासाभरात परिसर स्वच्छ झाला. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे तसेच श्रमदानाचे महत्त्व कळले.
याप्रसंगी गुंजी सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. उत्तुरकर, शारीरिक शिक्षक श्री. पाऊसकर, समाज विज्ञान शिक्षिका सौ. कुदळे आणि कन्नड शिक्षकांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात ४५ विद्यार्थी विद्यार्थिनीनी भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta