खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळचा खड्डा गेल्या सहा महिन्यापासून तसाच आहे.
याकडे संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर तालुक्याच्या आमदारांनी याची साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे या खड्ड्याचा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
निकृष्ट दर्जाचे काम
जत-जांबोटी महामार्गावरील परिश्वाड ते खानापूर पर्यंतच्या रस्त्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असताना या रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अपघाताना आमंत्रण होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta