खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तेरेगाळी गावची ग्राम देवता सातेरी माऊली मंदिराचे जीर्णोद्धार होऊन नवीन उभारण्यात आलेल्या मंदिराचा कळसारोहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
यावेळी मंदिराचा कळसारोहण डोंगरगाव मठाचे भयंकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेरसा माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, रामाप्पा मस्ती, बसवराज बडिगेर, तुकाराम घाडी, दादोबा घाडी, यशवंत घाडी, व्यंकोबा घाडी, यशवंत घाडी, विठ्ठल घाडी, आप्पाजी हळब, निंगापा हणबर,पांडुरंग घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत श्रीपाद शिवोलकर यांनी केले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचे हस्ते नुतन सातेरी माऊली मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्याची भाषणे झाली. कार्यक्रमाला गावचे पंच, नागरिक, अशोकनगरचे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीपाद शिवोलकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta