
खानापूर : श्री सोमलिंगेश्वर देवस्थान कमिटी (कौलापूरवाडा) तिर्थकुंडये महाशिवरात्री उत्सवानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन झाले. नंतर मानाची कुस्ती लावून कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा पं. सदस्य विलास बेळगावकर, भरमा पाटील, बाळेश चव्हानवर, विनायक नाईक, अर्जुन गावडा, अनंत गावडा, अनंत पाटील, कल्लाप्पा कंग्राळकर, मेहुल शहा तसेच तिर्थकुंडये गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण बन्नर, गुरुनाथ बन्नर, रामलिंग मोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta