Sunday , July 26 2026
Breaking News

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील

Spread the love
धनश्री पाटील : तवंदी येथे फलक अनावरण, हळदी कुंकू कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : महिला या प्रगत समाजात पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे अग्रेसर आहेत. भारतीय संवीधा नुसार महीला ही एक शिपाई ते राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. ही बाब बोरगांव येथील अरिहंत उद्योग समूह लक्षात घेऊन महिलांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकू व होम  मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मत धनश्री उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. तवंदी येथे उत्तम पाटील युवाशक्ती मार्फत भव्य हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम  झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
माजी आमदार प्रा.सुभाष जोशी, उत्तम पाटील यांच्याहस्ते उदघाटन समारंभ सोहळा पार पडला. त्यावेळी माजी आमदार प्रा. जोशी, उत्तम पाटील, धनश्री पाटील सत्कार करण्यात आला. बाबासो पाटील, राजेंद्र गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
होम मिनिस्टर  होण्याचा मान आराध्या मोरे यांना मिळाल. यावेळी  विशेष बक्षीस सुषमा पाटील यांना मिळाले.
 यावेळी निरंजन पाटील -सरकार, ग्राम पंचायत सदस्य रावसाहेब यमकनमर्डे, अभिजित कौंदाडे, लक्ष्मी कांबळे, राजू घाटगे, सुरेश घाटगे, विष्णु पाटील, कृष्णात कमते, श्रीधर पाटील, दिलीप पाटील, संदीप कनेरकर, नंदा सागर गुरव, रवींद्र पाटील, सागर पाटील, नितीन पाटील, शशिकांत पाटील, संदीप सुतार, सचिन शिवाजी पाटील, दिगंबर पाटील, एकनाथ पाटी, महावीर पाटील सुरेखा  घाळे यांच्यासह उत्तम पाटील युवाशक्तीचे कार्यकर्ते, उत्तम पाटील प्रेमी नागरिक उपस्थित होते. शिवाजी साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सागर गुरव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *