खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील जागृत देवस्थान माऊली देवीची यात्रा १२ वर्षानी गेल्या ८ ते १५ फेब्रुवारी पर्यंत मोठ्या उत्साहात पार पाडली. यात्रेला लाखोभाविकानी दर्शन घेतले. या काळात मंदिराच्या आवारात चारी बाजूंनी केरकचरा, प्लास्टिक बाॅटल, प्लास्टिक पिशव्या, इतर साहित्य जिकडे तिकडे विखुरलेले होते.
या परिसरात पाळीव जनावरे व रात्रीच्या वेळी जंगली जनावरे कचरातुन फिरत असतात त्याचा त्रास जनावरांना होतो. याची दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कणकुंबी ग्रामपंचायत याच्या संयुक्त विद्यामाने येथील माऊली विद्यालयाचे विद्यार्थी, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्राम पंचायत कर्मचारी, मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर आदींनी स्वच्छता मोहीमेत भाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta