खानापूर (प्रतिनिधी) : नॅशनल लेव्हल राष्ट्रीय सर्विस योजनेंतर्गत दि. १४ फेब्रुवारी ते दि. २० पर्यंत आम्बाला (हरियाणा) येथील महर्षि मार्केडेश्वर डीम्ड विद्यापीठ येथे देशातील १७ राज्यातील विविध काॅलेजच्या २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी शिर्शि येथील हाॅल्टिकल्चर काॅलेजची विद्यार्थीनी चैत्रा सुहास पाटील,(खानापूर), बागलकोट हाॅल्टिकल्चर काॅलेजची विद्यार्थीनी स्नेहा आर, कोलार हाॅल्टिकल्चर काॅलेजची विद्यार्थीनी वर्षा एन. ठरल्या. पोस्टर तयार करणे स्पर्धेत हाॅल्टिकल्चर काॅलेजची विद्यार्थीनी श्री लक्ष्मी सी, आरभावी हाॅल्टिकल्चर काॅलेजचा विद्यार्थी पांडुरंग आर एस, यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
सांस्कृतीक स्पर्धेत शिर्शि हाॅल्टिकल्चर काॅलेजची विद्यार्थीनी चैत्रा सुहास पाटील (खानापूर) , पांडुरंग आर एस (आरभावी) , स्नेहा आर (बागलकोट), वर्षी एन (कोलार), कार्तिक बी पी (म्हैसूर), श्री लक्ष्मी सी (बिदर) , सचिन एम के (हावेरी), धनराज एन (कोप्पळ) यानी प्रथम क्रमांक पटकाविला.
सांघिक स्पर्धेतील व्हाॅलीबाॅल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
याविजयी स्पर्धकांना आरभावी हाॅल्टिकल्चर काॅलेजचे प्राध्यापक डाॅ. विजय महांतेश याचे मार्गदर्शन लाभले.
तर विजयी स्पर्धकाचे अभिनंदन विश्वविद्यालय विद्यार्थी कल्याण निर्देशक डाॅ. रामचंद्र के नायक व विश्वविद्यालयाचे एन एस एस अधिकारी वसंत गाणगेर आदीनी केले.
या स्पर्धेत देशातील १७ राज्यातील २०० विद्यार्थ्यातून कर्नाटक राज्याच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केल्याबद्दल राज्यातून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta