खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुंडलिक हनुमंतराव चव्हाण होते. तर प्रमुख वक्ते म्हणून वैयक्तिक सल्लागार आणि संस्कृती एज्युक्युअरचे संस्थापक तेजस कोळेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भुवराह खानापूर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्रीनिवास धोत्रे, सी.ई.ओ प्रवीण पाटील, शाळा सुधारणा कमिटी सदस्य नारायण गुरव, मारुती गुरव, सुदेश दलाल, नरसिंग पाटील सदस्य नेहा नाईक, दीक्षा बेळगावकर उपस्थित होत्या.
तेजस कोळेकर सरांनी आपले विचार मांडताना संकटांना सहानुभूती मिळवण्यापेक्षा संकटांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे असे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत मुख्याध्यापक एस. एम. कदम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रुतिका पाटील यांनी करून दिला. विद्यार्थिनींनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान नाटक सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका सौ. एन. देसाई यांनी केले तर आभार सी. आय. पाटील यांनी केले
Belgaum Varta Belgaum Varta