खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारकाजवळील सरकारी दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ४० किलोमिटर अंतरावरून आलेल्या रुग्णांना परत जावे लागत आहे.
खानापूर तालुक्याचा विकास झाला असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहरातील सरकारी दवाखान्यात योग्य सोय केलीच नाही. याचा त्रास मात्र तालुक्यातील जनतेला होत आहे.
केवळ २० कोटी रुपये खर्च करून हाॅस्पिटलची इमारत उभारल्याने रुग्णांचे आजार दूर झाले नाहीत. सरकारी दवाखान्यात ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक आधी करणे अत्यंत गरजेचे आहे.
कारण खानापूर तालुका हा गेल्या पाच वर्षांत अनेक समस्यांनी हैराण झाला आहे. आधीच मागासलेला तालुका आहे. अशा मागासलेल्या तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रात सोय झाली नाही.
तेव्हा खानापूर शहराच्या सहकारी दवाखान्यात ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करून रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta