
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ येथील लोकमान्य सभागृहात रविवारी दि. ५ मार्च रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन पिटर डिसोझा होते.
तर व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी कमांडर स्वप्निल व्ही टी, बीईओ राजश्री कुडची, बैलहोंगल तहसीलदार जयदेव अष्टगणीमठ, उद्योजक मारूती वाणी, नारायण पाटील, अजित पाटील पुणे, निवृत्त प्राचार्य पी के चापगावकर, पंढरी परब, सचिन पाटील, पी पी बेळगावकर, प्राचार्य मोतीराम बारदेसकर, जेज्यू फर्नांडिस, निरंजन सरदेसाई, गोपाळ देसाई, उद्योजक नामदेव पाखरे, मजुनाथ आळवणी, प्राचार्या शरयू कदम, एस जी शिंदे, आदी उपस्थित होते. तर सत्कार मुर्ती डाॅ. प्रा. स्नेहल गीरी, डाॅ स्नेहल पाटील, डाॅ. गोविंद मिसाळ आदी हजर होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
पी पी बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवराचे मानचिन्ह व गुलाब पुष्प, डायरी देऊन स्वागत केले. तर सत्कारमूर्ती डाॅ. गोविंद मिसाळ, डाॅ. स्नेहल पाटील निपाणी, डाॅ. प्रो.स्नेहल गिरी, आदीचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. तसेच निवृत्त शिक्षकाचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन मान्यवरांच्याहस्ते ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्यावतीने इयत्ता१० वीसाठी प्रज्ञाशोध प्रश्नपत्रिका संच चे प्रकाशन करण्यात आले. तसेच दहावी प्रथम आलेल्या, विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बीईओ राजश्री कुडची, डेप्युटी कमांडर स्वप्निल व्ही टी, पंढरी परब, निरंजन सरदेसाई व इतर मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन पिटर डिसोझा म्हणाले की, गेली १३ वर्षे ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना खानापूर तालुका, बेळगाव तालुका आदी ठिकाणी गेले चार ते पाच महिने दहावी व्याख्यान मालेचे कार्य करत आहेत.
त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होत. तेव्हा विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवून चांगला अभ्यास करावा चांगले गुण घेऊन आईवडिलांचे, शाळा शिक्षकाचे व ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे नाव अजरामर करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव वाटूपकर यांनी केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिवाजी जागेवर पुणे, बी जे बेळगावकर, व्ही बी होसुर, एन एम देसाई, एस पी धबाले, एम एफ होनगेकर, एम डी पाटील, महेश सडेकर, पी के आळवणी तसेच विविध हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक आदींनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta