बेळगाव (प्रतिनिधी) : आगामी कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने खानापुर झोन अंतर्गत जांबोटी-खानापुर रोडच्या मोदेकोप्प क्रॉसजवळ आज संध्याकाळी मोठी कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दावलसाब शिंदोगी, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक जयराम जी. हेगडे आणि त्यांचे सहकारी मंजुनाथ बालगप्पा, प्रकाश डोणी हे रस्त्यावर गस्त घालत असताना ब्राउन भारत बेंझ गुड्स कॅरिअर १२ चाकी कंटेनर वाहनाची तपासणी करण्यात आली असता, त्या वाहनातून व्हिस्कीच्या २१६९६ (एकूण ३९०५.२८ लिटर गोवा दारू) च्या २१६९६ बाटल्या खानापुर झोनचे उत्पादन शुल्क निरीक्षक श्री. दवलसाबा शिंदोगी यांनी जप्त केल्या. सदर प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मद्य साठ्याची एकूण अंदाजे किंमत रु. ६७,७३,१२०/-. इतके आहे. डॉ. वाय. मंजुनाथ, अतिरिक्त आयुक्त उत्पादन शुल्क (गुन्हे), केंद्र बेळगाव, फिरोज खान किल्लेदार, उत्पादन शुल्क, बेळगाव विभागाचे सहआयुक्त यांच्या आदेशाने, कु. एम. वनजाक्षी, बेळगाव (दक्षिण) जिल्ह्याचे उत्पादन शुल्क उपायुक्त श्री, रवी एम. मुरगोड, बेळगाव उपविभाग उत्पादन शुल्क उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाव्दारे ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta