खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जनता आधार सौहार्द सोसायटीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने संचालिका सौ. कल्पना सावंत, व सौ. सविता गडाद या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता आधार सौहार्द सोसायटीचे चेअरमन व खानापूर तालुका आप आदमी पक्षाचे सचिव शिवाजी गुंजीकर उपस्थित होते.
तर कार्यक्रमाला व्हा. चेअरमन मोहन मुळीक, संचालक मजुनाथ बागेवाडी, बळीराम खन्नूकर, प्रभाकर पाटील, कर्याप्पा बेक्कीनकरी, पांडुरंग देसाई, रमेश कौदलकर, चंद्रकांत मेदार व सेक्रेटरी मनोहर पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी मनोहर पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व फोटो पूजनाने झाली.
यावेळी संचालिका सौ. कल्पना सावंत व सौ. सविता गडाद याचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन शिवाजी गुंजीकर यानी जागतिक महिला दिनाचे महत्व सांगुन महिला आज अबला नसुन सबला आहेत. असे विचार व्यक्त केले.
यावेळी सत्कार मुर्ती कल्पना सावंत व सविता गडाद यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
व्हा. चेअरमन मनोहर मुळीक यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta