खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणाला माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नाने सुरूवात झाली. कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर करून मलप्रभा क्रीडांगण उभारण्यात आले. मात्र या क्रीडांगणाकडे कोणीही विकासाच्या दृष्टीने पाहिले नाही.
आजी-माजी आमदारानी याकडे डोळेझाक केली. मात्र हेच लोकप्रतिनिधी मलप्रभा क्रीडागणावर मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा फायदा घेतात. तर दुसरीकडे मलप्रभा क्रीडांगणाबाबत विकासाचा प्रयत्न झाला नाही.
मलप्रभा क्रीडांगणाच्या समस्या
सध्या मलप्रभा क्रीडांगणाला सरंक्षण भिंत नाही. त्यामुळे क्रीडांगणाचा गैर वापर होताना दिसत आहे.
मलप्रभा क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालयाची सोय नाही.
वीजपुरवठ्याची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी दारू पिऊन बाटल्या फोडून कचरा केला जातो.
तसेच मलप्रभा क्रीडांगणावर कोणत्याही खेळाचे ग्राऊंड मार्किंक केले नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासुन शालेय स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे शालेय खेळाडूसाठी मलप्रभा क्रीडांगणाचा कधी फायदा झाला नाही. गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधी पाच रूपयाचा निधी सुध्दा खर्च केला नाही.
भविष्यात मलप्रभा क्रीडांगणाचा विकास होणार का? असा सवाल खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतून चर्चिला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta