खानापूर : भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत तसेच देसी गर्ल्सतर्फे खानापूर येथे जल्लोषात होळी साजरी करण्यात आली. यावेळी हजारो युवती, महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रेन डान्स, पारंपरिक नृत्य, डीजे, अन्नोत्सव या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपस्थित महिला, युवतींसह नृत्याचा आनंद लुटला. याप्रसंगी त्यांनी विचार व्यक्त केले. आजच्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोणत्याही क्षेत्रात त्या मागे नाहीत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महिलांसाठी काही उपक्रम हाती घेण्यात येतील, असे त्या म्हणाल्या.
खानापूर शहरासह परिसरातील अनेक युवती, महिलांनी होळी कार्यक्रमात भाग घेतला होता. रंगांची उधळण त्यांनी केली. डीजेच्या तालावर त्या थिरकल्या. त्यांना डॉ. सोनाली सरनोबत यांनीही साथ दिली. शिल्पा आद्याताई कल्याणी, स्वाती परेरा आदी त्यांच्यासोबत होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta