Thursday , March 5 2026
Breaking News

समर्थ इंग्रजी स्कूलचा क्रिडोच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : पूर्वापार चालत आलेल्या शैक्षणिक पध्दतीत बदल घडवून नविन संकल्पनेची जोड देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी लावण्यासाठी खानापूर येथील समर्थ इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांनी क्रिडोच्या माध्यमातून जागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.
याजागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीच्या माध्यमातून क्रिडोच्या पध्दतीचा अवलंब करून एल के जी, यू के जी व इयत्ता पहिली व इयत्ता दुुसरीच्या विद्यार्थ्यांना लॅबचे नियोजन करून शिक्षण देण्याचे कार्य समर्थ इंग्रजी शिक्षण संस्था करणार आहे.
या क्रिडोच्या संकल्पनेत यू के जी, एल के जी, व इयत्ता पहिली, दुसरी विद्यार्थी प्रात्यक्षिक करीत गणित, इंग्रजी, व सामान्य ज्ञानाचे धडे घेणार
यावेळी विद्यार्थ्यांना समजुन घेऊन शिक्षण घेणे ते जन्म भरायचे शिक्षण होते. कायमचे लक्षात राहते. शिक्षणाबद्दलची भिती दूर राहते, अशी माहिती क्रिडो योजनेच्या टीमने पालक वर्गाला पालक मेळाव्यात दिली. या पालक मेळाव्यात पालकांनी सकारात्मक व समाधानकारक प्रतिसाद दिला.
या पालक मेळाव्यात संस्थेचे सचिव डाॅ. डी ई नाडगौडा, संचालक एफ एम पाटील, डाॅ. राधाकृष्णन हेरवाडकर, व इतर संचालक, तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. माया नाडगौडा, इतर शिक्षकवर्ग तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *