सध्या आचार संहितेचा बडगा?
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या सरकारी दवाखान्यासाठी २० कोटी रूपयाचा निधी वापरून नविन इमारत उभारण्यात आली आहे.
मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेच्या कचाट्यात सापडल्याने नविन सरकारी दवाखान्याच्या इमारतीचा उदघाटनाचा मुहूर्त आता कधी मिळणार की कर्नाटक राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला प्रारंभ होणार याकडे खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
खानापूर शहरात नव्याने उभारले ल्या सरकारी दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम कंत्राटदाराने घिसाड घाई करून इमारतीला पुरेसे पाणी न मारता, होता होईल तितक्या लवकर काम संपविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे झाले नाहीतर भविष्यात इमारतीला आयुष्य कमी होणार. जवळपास २० कोटी रूपयाचा निधी वापरल्याने इतकी मोठी रक्कम वाया जाण्याची भीती तालुक्यात वर्तविण्यात येत आहे.
खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याची इमारत तयार झाली आहे. दुसरीकडे काही दिवसातच कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेला प्रारंभ झाला तर उद्घाटन सोहळा होणे कठीण आहे.
अजून नुतन सरकारी दवाखान्याच्या इमारतीत बरीच कामे आहेत. तेव्हा कामे संपेपर्यंत आचारसंहितेचे दिवस जवळ येऊ लागले आहेत. या आचारसंहितेत नुतन सरकारी दवाखान्याच्या इमारतीचे उद्घाटन सोहळा पार पाडणे. शक्य नाही.
तेव्हा आचारसंहिता लागू झाली की निवडणुकीची धुमधाम त्यातच निकालाची प्रतिक्षा त्यानंतर मे महिना ओलांडून जाणार. त्यातच नविन येणारे लोकप्रतिनिधी राज्यात येणार नविन सरकार त्यामुळे खानापूर शहरातील नुतन सरकारी दवाखान्याला उद्घाटनाचा मुहूर्त आगामी विधानसभा निवडणुकीनंतर नविन आमदारांच्या व नविन सरकारच्या हस्ते होण्याचे संकेत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta