Tuesday , March 3 2026
Breaking News

वनहक्क कायद्याची खानापूर तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; निवेदनाव्दारे मागणी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : वनहक्क कायद्याची खानापूर तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा मागणीचे निवेदन उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीचे निमंत्रक महादेव मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील अनेक शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यांना वनहक्क मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे लढत आहेत. तेव्हा सरकारने वनहक्क समितीला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीचे निमंत्रक महादेव मरगाळे, अभिजीत सरदेसाई, तसेच वनहक्कापासून वंचित असलेले शेतकरी परशराम गवाळकर, धनाजी पाटील, शशिकांत पाटील, महादेव मुतगेकर, परशराम येलुरकर, प्रकाश गावकर, जयवंत पाटील, सूर्यकांत गावकर, जानू विठू जंगले, नवलू आवने व इतर शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *