खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार मतदार संघात समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला जात असतानाच खानापूर तालुक्यात दूही माजविण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरु केला आहे. मात्र या मागचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. तसेच समिती विरोधात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांतून दिला जात आहे.
खानापूर तालुका समितीमध्ये एकी व्हावी यासाठी कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून कार्यरत होते. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुढाकार घेऊन तालुक्यात दोन्ही गटात विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून समितीमध्ये एकी घडवून आणली. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि कार्यकर्तेही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सूचनेनुसार चार मतदार संघात समितीचा भगवा ध्वज फडकविण्यासाठी सज्ज झालेले असतानाच सुरुवातीपासूनच एकी होऊ नये यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या काही जणांनी अचानकपणे नवी चूल मांडण्याचा प्रयत्न करीत कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र याच्या मागे भाजपचा एक नेता असुन त्याने सांगितल्यामुळेच मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याकरिता काही जणांनी हा प्रयत्न केला आहे. अशी चर्चा सुरू झाली असून ज्यांनी समितीमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ते भाजप नेत्याच्या संपर्कातील असुन समितीने तालुक्यात एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने आपली डाळ शिजणार नाही. हा विचार करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्यादाना पुढे केले आहे. मात्र खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक आणि जनता सुज्ञ असून समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार गावागावातून केला जात आहे.
मध्यवर्ती समितीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून बेकी करणाऱ्याना त्यांची जागा दाखवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून समितीपासून दूर गेलेला एक युवा नेताही बेकि व्हावी यासाठी प्रयत्न करीत होता असे मत काही कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. मात्र लवकरच बेकी करणाऱ्यांना मराठी भाषिक त्यांची जागा दाखवून देतील आणि अशा या गद्दारांना हुतात्म्यांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta