खानापूर : जांबोटी- रामापूरपेठ (ता.खानापूर) येथील श्री मंजुनाथ दुर्गादेवी दत्त मंदिराचा वर्धापनदिन शनिवार दि. २२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. दि. २१ आणि २२ रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु जांबोटीत २१ रोजी वार पाळणूक असल्याने दि. २१ रोजीचे धार्मिक विधी २० रोजी करण्यात आले. त्यामध्ये नवग्रह स्थापना, नऊमुखी कालसर्प, काळभैरव, कालीमाता यांची स्थापना असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
शनिवार दि. २२ रोजी श्री मंजुनाथ दुर्गादेवी दंत मंदिराचे प्रमुख अरुण महाराज कणगुटकर यांच्या सानिध्यात सोनोलीचे परशुराम महाराज कणगुटकर यांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते १२ पर्यंत दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. याप्रसंगी आळंदी येथील भागवताचार्य गजानन महाराज इंगोले यांची उपस्थिती लाभणार आहे. पुसेगावचे सेवागिरी महाराज, गुंडीबाबामठ मठाधिपती आनंदगिरी महाराज, जुना पन्हाळा येथील शिवयोगी सिद्धलिंग महाराज, कवठेमहांकाळ येथील कैलासपती महाराज व बेळगाव इस्कॉनचे आचार्य उत्तमश्लोक प्रभू आदींच्या उपस्थितीत वर्धापनदिन होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरुण महाराज कणगुटकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta