Thursday , March 5 2026
Breaking News

प्रियंका गांधी यांची खानापुरात उद्या जाहीर सभा!

Spread the love

खानापूर : खानापूर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता श्री मलप्रभा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रियंका गांधी यांचे सिक्यूरिटी ऑफीसर व त्यांचा स्टाफ दिल्लीवरून खानापूरात पोहचला आहे, प्रियांका गांधी यांच्या सिक्युरिटी ऑफीसर सोबत आमदार डॉ. अंजलीताईं निंबाळकर यांनी मलप्रभा ग्राऊंडवर जाऊन सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *