खानापूर : आपल्या साधेपणामुळे नेहमीच घराघरात नावलौकिक मिळवलेल्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे आणखी एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले. खानापूर तालुक्यातील हंदूर गावात प्रचारासाठी गेलेल्या आणि पेशाने स्त्रीरोग तज्ञ असणाऱ्या खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी चक्क चुलीवर गरमागरम भाकऱ्या थापून आपल्या पाक कौशल्याची झलक दाखवून दिली.
नेहमी महिलांसोबत असणाऱ्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणावर नेहमीच भर दिला आहे. खानापूर येथे गर्भिणी माता आणि नवजात शिशूंसाठी एक मोठे हॉस्पिटल बांधले आहे.
काल खानापूर येथे काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस श्रीमती प्रियांका गांधी प्रचारसभेसाठी आल्या असताना हेलिपॅड पासून सभामंडपापर्यत आमदार डॉ. अंजली निंबाळकर त्यांना आपल्याच कार मधून गाडी चालवत घेऊन आल्याचंही उपस्थित महिलांनी कौतुकाने पाहिलं होतं. आज हंदूर गावात तालुक्यातील जनतेला चुलीवर साधेपणाने उत्तर कर्नाटक ग्रामीण शैलीत रोटी बनवण्याची त्यांची झलक पहायला मिळाली. या आणि अशा अनेक सहज प्रसंगातून पुन्हा एकदा महिला मात्र आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर फिदा झाल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta