घरोघरी प्रचार; मुरलीधर पाटलांना मताधिक्य देण्याचे आवाहन
खानापूर : हेब्बाळ आणि लालवाडी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खानापूर मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी कोपरा सभा घेऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. दोन्ही गावातील मराठी भाषिकांनी समितीच्या पाठिशी असून मुरलीधर पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला.
मनोहर कुट्रे म्हणाले, “आजवर लालवाडीतील जनतेने सीमा चळवळीला सहकार्य केले आहे. राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना न भुलता येथील मतदार समितीला मत देतील. गावाची परंपरा समितीला मतदान देण्याची आहे.
यावेळीही येथील मराठी भाषिक मतदार नक्कीच आपली परंपरा राखतील.” समिती हाच आमचा प्राण आहे. आजवर अनेकदा राष्ट्रीय पक्षांनी चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सजग असणाऱ्या समिती कार्यकर्त्यांनी चळवळ टिकविली. आता मुरलीधर पाटील यांना मोठे मताधिक्क्य देऊन विजयी घोडदौड कायम ठेवूया, असे आवाहन उदय कापोलकर यांनी केले.
यावेळी वयोवृध्द मतदारांनी कार्यकर्त्यांसमवेत गावात प्रचार करुन मुरलीधर पाटील यांना मत देण्याचे आवाहन करण्यात आले. हेब्बाळमध्येही मराठी भाषिकांनी घरोघरी श्री. पाटील यांचा प्रचार केला. यावेळी गावातील समिती कार्यकतें उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta