बेळगाव : बेळगाव सीमाभागात विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल गुरुवारी टिळक चौक येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बेनकनहळी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार सतेज पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर आज शुक्रवारी खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काँग्रेस उमेदवार डाॅ.अंजली निंबाळकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी अशोक चव्हाण आले असता म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून आणि जोरदार घोषणा निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान घोषणा देत असलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta