
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवार आ. डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतली.
खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच गॅरंटी मतदारांना समजावून सांगितल्या. आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात अधिकाधिक विकास कामे करून जनतेचे कल्याण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान अशोक चव्हाण यांनी पदयात्रा काढून आ. निंबाळकर यांचा प्रचार केला. मतदारांशी संवाद साधून काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
Belgaum Varta Belgaum Varta