सीमा लढ्यात अग्रभागी असणारा खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले मुरलीधर पाटील सध्या भूविकास बँकेचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. गेली 66 वर्षे चाललेला हा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. मराठी भाषिक बहुभाग कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून मराठी भाषिकांना नेहमीच सावत्रपणाची वागणूक दिली जाते. त्यांचे हक्क आणि अधिकार सातत्याने पायदळी तुडविले जातात. भाषा व संस्कृती संपविण्याचा कर्नाटक शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न होत आहे. सीमा खटल्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत येथील मराठी भाषेचे हक्क व मराठी भाषा संस्कृतीचे रक्षण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी भाषिकांच्या वतीने प्रशासनाशी लढा देत असते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून काम करत असताना तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत श्रीयुत मुरलीधर पाटील यांचा संपर्क होत आलेला आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेला अडीअडचणीच्या वेळी निस्वार्थी भावनेने मुरलीधर पाटील यांनी मदत केलेली आहे. सीमा लढा बरोबरच भूविकास बँकेच्या माध्यमातून देखील ते कार्यरत असल्यामुळे मराठी भाषिकांसह इतर भाषिकांशी देखील त्यांचा जवळचा संपर्क आहे. तालुक्यातील तळागाळातील लोकांची जनसंपर्क पाहता यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय हा निश्चित आहे.
मुरलीधर पाटील यांनी भूविकास बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले आहे. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शेती कर्ज, वाहन कर्ज योजना, आरोग्य, शिक्षण, जलसिंचन आदी योजनांवर भरीव काम केलेले आहे. सरकारच्या विविध योजना सर्व गरजू व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहेत. पेशाने अभियंता असलेले मुरलीधर पाटील कंत्राटदार म्हणून देखील यशस्वी ठरलेले आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी अनेक गरजूंना मदत केलेली आहे. कित्येक बांधकाम कामगारांना जीवनोपयोगी साहित्य दिले आहे तर अनेकांच्या हाताला काम देखील दिले आहे. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून यावेळी खानापूर मतदारसंघातून श्री. मुरलीधर पाटील हे विधानसभेत जाणार हे मात्र नक्की.
सीमा प्रश्न सोडवणे सोबतच खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे मराठी भाषा व मराठी संस्कृती टिकविण्यासोबतच मराठी शाळा टिकविणे व त्यांना उर्जित अवस्था प्राप्त करून देण्याकडे मुरलीधर पाटील यांचा कल असणार आहे. खानापूर तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागांमध्ये जाऊन वास्तव्य करावे लागत आहे. त्यासाठी भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. शेती आणि उद्योगधंद्यांसाठी नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असणार असे देखील मुरलीधर पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रीय पक्षांचे तगडे आव्हान पेलावे लागत आहे. राष्ट्रीय पक्ष पैशाच्या जोरावर उमेदवार जमा करतात तर महाराष्ट्र एकीकरण समिती ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची समिती म्हणून ओळखली जाते.
समितीचा कार्यकर्ता हा पदरमोड करून सीमा लढ्यात सहभागी होत असतो आणि हाच निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे समितीची खरी ताकद आहे.
शांत व संयमी व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून खानापूर तालुक्याला मुरलीधर पाटील लाभलेले आहे. त्यांचा सीमा लढ्यातील सहभाग, समितीशी असलेली निष्ठा व निष्ठावंत कार्यकर्ते याच ताकतीच्या जोरावर श्रीयुत मुरलीधर पाटील हे विधानसभेत भगवा फडकविणार हे निश्चित.
Belgaum Varta Belgaum Varta