विविध विषयावर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रजमिनी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांमध्ये गेली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची काम ही अपूरी आहेत. तसेच काही सर्व्हिस रोड झाले नाहीत. त्याठिकाणी मुलाना, महिलाना, जनावरांना महामार्ग ओलांडणे धोक्याचे झाले आहे. त्याठिकाणी सर्व्हिस रोड व्हावे. खानापूर- लोंढा रामनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावे.
जांबोटी- चोर्ला गोवा महामार्गावर रूंदी करण्याच्या कामाला वाईल्ड लाइफ सेंचुरीकडून विरोध होत आहे तो थांबवावा. तसेच या महामार्गाचे पावसाळ्या आधी पॅचवर्क करावे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याची कामे अर्धवट आहेत ती पूर्ण करावी.
अशा विविध विषयांवर खानापूर तालुक्याचे नुतन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. व लवकरात लवकर खानापूर तालुक्यातील समस्या सोडवा, अशी मागणी केली.
यावेळी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते ऍड. चेतन मणेरीकर, लैला शुगर्स एमडी सदानंद पाटील आदी भाजप नेते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाचे अधिकाऱ्यांनी समस्यांचे निवारण करू असे आश्वासन दिले.