बेळगाव : 1 जुन रोजी होणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गर्लगुंजी येथील येथील अरुण मष्णू पाटील (वय 63) हे 1 जून रोजी होणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी बेळगावला आले होते. संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान ते येळ्ळूर मार्गी गावाकडे निघाले असता सुळगा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आज दि. 26 सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
ग्रामीण पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta