खानापूर : निवडणूक म्हणजे पक्षाच्या अथवा संघटनेच्या नेते मंडळी, कार्यकर्ते यांची कसरत असते. नुकताच विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी शमली आहे. आता पुन्हा लक्ष लागले ते खानापूर नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडीकडे त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी मे महिन्यात संपला आहे. आता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या आरक्षणाची लवकरच तारीख जाहीर होणार आहे. सध्या खानापूर नगरपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. तेव्हा नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मागील अडीच वर्षाच्या काळात नगराध्यक्ष म्हणून मजहर खानापूरी यांनी दोन वर्षे कारभार सांभाळला. तर सहा महिने नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी काम पाहिले.
आता पुढील आडीज वर्षाच्या काळासाठी लवकरच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणूक होणार आहेत. खानापूर नगरपंचायतींच्या २० नगरसेवकातून कोण भाग्यवान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष होणार हे आता निवडणूक पार पडल्यानंतरच समजणार आहे.
त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष अडीच वर्षाचा कालावधी जुन महिन्यात संपण्याची शक्यता आहे. सन २०२१ मध्ये तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. या निवडीकडे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्याचे लक्ष लागून आहे.
तर गेल्या दोन वर्षांपासून निवडणूकीच्या प्रतिक्षेत असलेल्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीबाबतीत तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
तालुका पंचायत व जिल्हा पंचायत सदस्य नसता तालुक्यातील विकासाचा कसा खेळखंडोबा झाला आहे. याची तालुक्यातील जनतेला चांगलीच जान आहे. अजून किती दिवस ता. पं. व जि. पं. सदस्यांच्या निवडणूकीसाठी वाट पाहावी लागणार आहे. अशी चर्चा खानापूर तालुक्यातील जनतेतून होताना दिसत आहे. या निवडणुकी संपताच पुन्हा येत्या २०२४ च्या जानेवारीत लोकसभा निवडणुकी होण्याची संभाव्यता आहे. तेव्हा निवडणूक आता लागोपाठ एकेक होतच राहणार आहे.