खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार येताच सर्व सामान्य जनतेवर अन्यायी वीज बिलात दुप्पटीने वाढ करून काँग्रेस सरकारने आपले खरे दात दाखवुन जनतेची फसवणूक केली आहे. यासंदर्भात खानापूर तालुका भाजपच्या वतीने खानापूर तहसील कार्यालयात जोरदार निदर्शने करून तहसीलदाराना निवेदन सादर केले.
यावेळी ऍड. आकाश अथणीकर यांनी निवेदनाचा हेतू सांगितला. तर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी यांनी जनतेवर अन्यायी वीज दरवाढ याचा मोठा परिणाम झाल्याचे सांगुन राज्यात काँग्रेसचे सरकार येताच १५ दिवसात वीजेचा झटका दिला आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे वीजेच्या वाढीव दराने कंबरडे मोडले आहे.
पुढे म्हणाले की, २०० युनीट मोफत वीज देतो म्हणणाऱ्या काँग्रेस सरकारने मे चे वीजबील दुप्पटीने वाढविले आहे. अशा सरकारवर राज्यातील जनता जास्त दिवस विश्वास ठेवणार नाही, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की, नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस सरकारने जनतेला आमिषे दाखवत २०० युनिट मोफत वीज, महिला प्रमुखाला दरमहा २००० रूपये, महिलांसाठी मोफत बस प्रवास, बेरोजगार पदविधारकाना ३००० रूपये तर डिप्लोमा धारकांना १५०० रूपये प्रति महिना तर महिलाना बिनव्याजी ३ लाख रूपये कर्ज अशी आमिषे दाखवत राज्यात निवडणुकीत यश मिळविले. आता त्याची पुर्तता करणे कठीण होणार. त्याचीच प्रचिती म्हणून वीज बिलात दुप्पटीने वाढ करून पैसा गोळा करून राज्याचे दिवाळे काढण्याचे हेतू जनतेसमोर आणला. असे सरकार जास्त काळ टिकणार असे मत व्यक्त केले.
यावेळी बाळू सावंत, जयंत तिनेईकर, संजय कुबल आदीनी आपले विचार व्यक्त केले.
निवेदन देताना खानापूर तालुका भाजप नेत्यां बरोबर सचिव गुंडू तोपिनकट्टी, राजेंद्र रायका, युवा नेते पंडित ओगले, ऍड. आकाश अथणीकर, प्रकाश निलजकर, रवी बडगेर, शिवा मयेकर, निवृत्ती पाटील, गावकर मामा, आदी शेकडो भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ग्रेड टू तहसीलदार एस. के. तंबोळी यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारी विरोधात घोषणाबाजी करून तहसीलदार कार्यालय हादरून सोडले.
Belgaum Varta Belgaum Varta