खानापूर : कु. वैभव मारुती पाटील मुळगाव बिदरभावी तालुका खानापूर आत्ता बेंगलोरमध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे.
बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटीलने 9000मी. व 10000 मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन दोन्ही विभागात प्रथम क्रमांक घेऊन दोन सुवर्णपदके संपादन केली आहे.
कर्नाटका आंतरराज्य खुल्या गटामध्ये धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा कर्नाटक प्रशासनामार्फत घेतल्या होत्या त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हा विद्यार्थी विदर्भावी शाळेचा विद्यार्थी असून आज गर्लगुंजी गावचे ज्येष्ठ धावपटू कोच व खोखो कोच असणारे श्रीयुत लक्ष्मणराव गोपाळराव कोलेकर यांच्या अथक प्रयत्नाने बेंगलोर स्टेडियमवर सराव करत आहे. तसेच होस्टेल व कॉलेज अल आमिन कॉलेज प्रिन्सिपल व शारीरिक शिक्षक तसेच कंटिरीवा स्टेडियमचे एन आय एस कोच त्यांना प्रशिक्षण देत आहेत.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक समस्येतून अथक प्रयत्नातून व आई-वडिलांच्या कृपाशीर्वादातून असे विद्यार्थी घडू शकतात याचे उदाहरण मार्गदर्शक कोलेकर सर आणि त्यांच्या सहकार्याने शिक्षण व शारीरिक कौशल्य आपले विद्यार्थी संपादन करू शकतात हे आज वैभव पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आदर्श घालून दिलेला आहे ही आमच्या खानापूर तालुक्याचे वैभव आहे. आज सर्व खानापूर तालुक्यातील संघ संस्था व कर्नाटकातील अनेक लोकांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta