खानापूर : ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी शाळेंना भेट देऊन तेथील परिस्थिती पाहून गरज भासल्यास शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपची मदत होत आहे. आज कार्यकर्त्यांनी गणेबैल शेजारील झाड-अंकले गावच्या सरकारी प्राथमिक शाळेला भेट दिली.
विद्यार्थीनींनी गुलाब पुष्प देऊन व गाणी गावून उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची व शाळेची माहिती दिली.
लोकराजा राजर्षी शाहु महाराजांच्या जयंती निमित्ताने राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना शाहु महाराजांच्या लोककल्याणाच्या कामाची थोडक्यात माहिती दिली.
कोल्हापूर शहराची तहान ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर 100 वर्षांपूर्वी राधानगरी धरणाची निर्मिती केली. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना सवर्णांनी समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
समजाच्या उन्नतीसाठी भेदभाव सर्वात मोठी बाधा आहे. जाती आधारित संघटनांचे निहित स्वार्थ असतात आणि अश्या संघटनां वाव देण्यापेक्षा त्यांना संपवणे गरजेचे आहे हे सांगितले.
त्याचप्रमाणे राहुल पाटील यांनी आजचा 26 जून 2023 हा दिवस आंतरराष्ट्रीय (नो ड्रग डे) निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या (दारू, तंबाखू, गुटखा, बिडी/सिगारेट, चर/गांजा/अफीम) आहारी गेल्यास काय दुष्परिणाम होतात याची कल्पना दिली. विद्यार्थ्यांनी व्यसनाकडे न जाता एक सुदृढ पीढी घडवण्यासाठी प्रत्येकानी व्यसनापासून दुर रहाण्याचे प्रयत्न करावे, अशी विनंती इतरांनाही करावी, तसेच आपल्या पालकांनाही व्यसनमुक्तीबद्दल माहिती देऊन त्यांनीही व्यसनापासून दूर राहण्याची विनंती विद्यार्थ्यांना करावयास सांगितली. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक मॅडम, मोहन पाटील सर व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta