खानापूर : खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सोमवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी पालकांना ही आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चरण स्पर्श करून व फुले वाहून आशीर्वाद घेतले. शिक्षक व शिक्षकेतर वर्गाला शाळेच्या परंपरेप्रमाणे गुरुदक्षिणा देण्यात आली. विद्यार्थी वर्गाने गुरुपौर्णिमा विषयावर भाषण केले. प्राचार्या सौ. श्रद्धा दिपक पाटील यांनी गुरुपौर्णिमेची महती सांगितली. संस्थेचे माजी कार्यदर्शी सदानंद कपिलेश्वरी यांनीही गुरुपौर्णिमेचा इतिहास थोडक्यात व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांनी अध्यक्षीय भाषणात गुरू द्रोणाचार्य-अर्जुन, द्रोणाचार्य -एकलव्य, आर्य चाणक्य- चंद्रगुप्त मौर्य, रमाकांत आचरेकर व सचिन तेंडुलकर यांची उदाहरणे देऊन गुरू व शिष्य या नात्याचे महत्त्व विद्यार्थी वर्गाला पटवून सांगीतले. शिक्षिका सौ. ज्योती जांबोटकर यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्य शिक्षक वर्ग उपस्थीत होता.
Belgaum Varta Belgaum Varta