खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बस सेवा सुरू केल्यास सर्वांच्या सोयीचे होईल. अन्यथा येत्या १४ जुलै रोजी खानापूर वकिल संघटनेच्या वतीने रास्तारोकोचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी खानापूर वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी म्हणाले की, वेळोवेळी निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून विनंती केली तरी केएसआरटी बेळगांव डेपो मॅनेजर, खानापूर डेपो मॅनेजर कोणतीही ठोस भुमीका घेत नसून आता रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही. जर १४ जुलै पर्यंत प्रत्येक अर्ध्या तासाला एक अशा प्रकारे शटल बस सेवा सुरू न केल्यास कोर्टासमोर रास्ता रोको करण्याचा इशारा वकील संघनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, वरिष्ठ वकील हिंदुराव ना. देसाई, चेतन मणेरीकर, श्री. गजानन देसाई, श्री. सादिक नंडगडी, जी जी पाटील, व्ही एन पाटील, सौ. राजेश्वरी हिरेमठ, मदन देशपांडे, राजू अंद्रादे, आय बी लंगोटी, विजय हिरेमठ, मारुती कदम व बहुसंख्य वकीलांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta