खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात पावसाला उशीरा सुरूवात झाली. जुन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भात पेरण्या वेळेत झाल्या नाहीत. भात उगवण योग्य झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणी संकट आले.
काही भागात भात लागवडीसाठीची तयारी करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात पावसाने तुरळक सुरूवात केली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असुन शुक्रवारी सकाळपासून पावसाच्या संततधार आगमनाने नदी-नाल्याना पाणी आले आहे.
तालुक्यातील जांबोटी, कणकुंबी जंगल भागात पावसाची जोरदार सुरूवात झाल्याने मलप्रभा नदीला पाणी आले आहे.
खानापूर नगरपंचायतींचे आवाहन
सध्या पावसाचे पाणी मलप्रभा नदीला आले असुन मलप्रभा नदीचे पाणी फिल्टर करून सोडले. मात्र येत्या चार दिवसापर्यंत मलप्रभा नदीचे पाणी कुणी ही पिण्यासाठी वापरू नये. केवळ वापरण्यासाठी पाणी वापरावे, असे आवाहन नगरपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे आहे.
खानापूर: १८.४ मि. मी., नागरगाळी: ११.८ मि. मी., बिडी: ८ . ८मि.मी., कक्केरी: ७ ८ मि. मी., असोगा : २४.२ मि मि., गुंजी: २३ मि. मी., लोंढा रेल्वे: २२ मि. मी., लोंढा पी डब्ल्यू डी: १९.२ मि. मी., जांबोटी : ३२ . २ मि. मी., तर सर्वात जास्त पावसाची नोंद कणकुंबी येथे ५८: ४ मि. मी. झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta