खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा तिढा अखेर आज सुटला.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी निवडीसंदर्भात इडलहोंड येथे दि. 10 जुलै रोजी माजी आमदार दिगंबराव पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मागील आठवड्यात झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वसाधारण बैठकीत झालेल्या चर्चेला अनुसरून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी पुन्हा गोपाळ देसाई यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी मुरलीधर पाटील, निरंजन देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, सहचिटणीस रणजित पाटील, खजिनदार संजीव पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत तर उपाध्यक्ष म्हणून जयराम देसाई, कृष्णा कुंभार, मारुती गुरव, रमेश धबाले आणि कृष्णा मन्नोळकर यांची निवड करण्यात आल्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी जाहीर केले.
Belgaum Varta Belgaum Varta