
खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना र. घटक यांची खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता मासिक बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष श्री. बनोशी आणि प्रमुख पाहुणे श्री. चांगाप्पा निलजकर तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक, अरविंद कुलकर्णी, योगगुरु हलकर्णी, सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉ. फरात मुल्ला व डॉ. नागराज राठोड व खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत भव्य असा जनहित व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीमती उमा अंगडी यांच ईश्वर स्तवन व स्वागत गीताने झाले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व पदाधिकारी प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती हे व्यासपीठावर विराजमान होते.
प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी स्वागत आणि कार्यक्रमाचा अहवाल सादर केला.
यामध्ये खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा मागील बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये सदस्यत्व स्वीकारून भव्य सत्कार केला.
या वेळेला आमदारांनी आपला प्रतिनिधी चांगाप्पा निलजकर तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, संचालक माजी अध्यक्ष महालक्ष्मी ग्रुप साखर कारखान्याचे संचालक, शांतिनिकेतन स्कूलचे संचालक व माजी तालुका सदस्य खानापूर यांचे ज्येष्ठ नागरिकांचे
सदस्यत्व स्वीकारून सत्कार करण्यात आला व मार्गदर्शक व समन्वय म्हणून नेमणूक करण्यात आली. यावेळी या संघटनेच्या विकासासाठी मी नेहमी कार्यरत राहील अशी ग्वाही दिली.
अरविंद कुलकर्णी हे खानापुरातील एक उद्योजक आहेत. तसेच व्यक्ती विकासासाठी पतंजली योग संस्था खानापूर या ठिकाणी योगाची प्रशिक्षण देतात. यांची खानापूर तालुक्याला एक मोलाची देणगी समाज विकासासाठी दिली आहे यांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच सुभाष देशपांडे हे पतंजली योग गुरु आहेत मांगरीश हॉल योग प्रशिक्षणास नेहमी मोफत खुला करून देत असतात तसेच खानापूर तालुक्यातील उद्योगपती व समाज सहकाराचे ते सेवक आहेत. श्री देवेगौडा चॅरिटेबल हॉस्पिटल बेळगाव ही संस्था बेळगाव जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत व हेल्थ कार्ड करून नोंदणीकृत सदस्यांना सवलतीमध्ये इलाज उपचार केला जातो.
या संघटनेने ज्येष्ठ नागरिकांचा जन्म प्रकट दिन साजरा करण्याची योजना प्रथम हलशी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक
एल. डी. पाटील यांचा जन्मदिन सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला. तसेच या महिन्यामध्ये जन्मदिन असणाऱ्यांचे जन्मदिन ऑगस्ट मासिक बैठकीमध्ये करण्याची ठरले.
योग गुरूंच्या समवेत जागतिक योगा दिन योगासने, प्राणायाम, प्रत्याहार याची प्रात्यक्षिके करण्यात आली. श्री देवेगौडा चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व बीपी व शुगर तपासून मोफत औषधे व हेल्थ कार्ड आयुष्मान भारत कार्ड करिता नोंदणी करण्यात आली. यावेळी 70 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला व योगा अभ्यास करण्यात आला.
अध्यक्षांनी या महिन्याचे उपक्रमामध्ये मोफत नेत्र तपासणी व उपचार आणि मोफत चष्मे देण्याकरिता शिबिर भरवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नवीन सभासद जास्तीत जास्त नोंदणी करावे असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आणि सहकारी सोसायटीच्या सभासद नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले.
श्री. एल. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
बैठकीला खानापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे व समस्त तालुका नागरिकांचे तसेच श्री ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta