

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध भागात धुवांधार पावसाने मंगळवारी रात्री पासून हजेरी लावली. त्यामुळे हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवर तीन फुट पाणी आल्याने तसेच मणतुर्गा पुलावर पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी रूमेवाडी क्राॅसवर फलक लावून हेम्माडगा मार्ग वाहतुकीला बंद असल्याचे सांगितले आहे. कोणी येथून प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.
गेल्या चार दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे जांबोटी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी ओढ्यात वडाचे झाड कोसळून विद्युत खांब, तारा तुटल्या वीज प्रवाह खंडीत झाला. तर दुपारी पणजी- बेळगाव महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलाजवळ भले मोठे झाड कोसळून वाहतुक ठप्प झाली.
बुधवारी पहाटे पासून पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे हेम्माडगा भागात पावसाचा जोर कायम असल्याने या भागातील ३० ते ४० खेड्यांचा खानापूर शहराशी संपर्क तुटणार आहे. मणतुर्गा व्हाया असोगा मार्गाने वाहतुकीसाठी नागरीकांना अवलंबुन राहावे लागणार आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद झाली असुन सर्वात जास्त पावसाची नोंद कणकुंबी येथे २३५ मि. मी इतकी झाली आहे. तर खानापूर: ८०.२ मि. मी, नागरगाळी: १०४.४ मि मी, बिडी: ७१.२ मि. मी. कक्केरी:१००.२ मि. मी, असोगा: १०३.६मि.मी.गुंजी: १३३.मि.मी.लोढा रेल्वे: १५३ मि. मी, लोंढा पी डब्ल्यू डी: १५२.४ मि, मी. जांबोटी: १२९ मि. मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta