खानापूर : गेल्या चार दिवसापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे.
तालुक्यातील पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर शहरालगत रूमेवाडी क्राॅस जवळ रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी आले त्यामुळे रस्ता वाहुन गेला आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.
हालात्री नदीला पाणी आल्याने तिवोली पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे.
त्यामुळे हेम्माडगा मार्ग पूर्ण पणे बंद करण्यात आला आहे.
कणकुंबी, जांबोटी भागात पावसाचा सतत मारा सुरू आहे त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. हब्बनहट्टी येथील मारूती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कणकुंबी येथे २०५ मि मी इतकी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद खानापूर: ७१.१ मि. मी, नागरगाळी: ५९.४ मी. मी, बिडी: ५४.८ मि. मी, कक्केरी: १०३ . ६ मि मी, असोगा: ८० मि. मी, गुंजी : १०४ २ मि मी. लोंढा रेल्वे : ८९ मि. मी, तर लोंढा पीडब्लडी: ८५ मि मी., जांबोटी: ९९.२ मि. मी. तर सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कणकुंबी येथे २०५ मि. मी इतके झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta