खानापूर (सुहास पाटील) : राज्यासह खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांना बीएलओचे काम सरकारने लावले आहे. एकीकडे शिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यातच रिक्त असलेल्या शिक्षकांच्या कामाचा भार घेणे, राष्ट्रीय सन, क्रीडा स्पर्धा, प्रतिभा कारंजी स्पर्धा, आधार सिंडींग, ऑनलाईन काम, माध्यान्ह आहार, मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात शिक्षकाना वेळ मिळत नाही. त्यातच मुलाना गुणात्मक शिक्षण देताना त्रास होतो. एवढेच नव्हे तर पालक व समाजाकडून ही बोलणी बोलुन घ्यावी लागतात.
या सर्व बाबीचा विचार करून सरकारी प्राथमिक शाळातील शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील बीएलओ शिक्षकांनी तसेच प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवारी दि. २५ रोजी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
निवेदनात शिक्षकांनी अनेक समस्या मांडल्या आहेत.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड निवेदनाचा स्विकार करून बीएलओची जबाबदारी तुम्हाला सोडता येणार नाही. असा सल्ला दिला व सरकारकडे निवेदन पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय एम पाटील, कार्यदर्शी एम आर चलवादी, तालुका नोकर संघटनेचे अध्यक्ष बी एम येळ्ळूर, पदाधिकारी बी बी चापगावकर, के एच कौदलकर, पिराजी पाखरे, सतीश हळदणकर, टी बी मोरे, गुलाब बेपारी, श्री मेदार, श्री बळगाप्पणावर, पी, पी कुंभार, श्री गडाद, सौ अंजना देसाई, श्रीमती सेटकर,श्रीमती, शेटर, श्रीमती बुरूड, आदी तालुक्यातील बी एल ओ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta