Thursday , March 5 2026
Breaking News

खानापूरात समुत्कर्श संस्थेकडून ५ ऑगस्ट रोजी आयएएस अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन शिबीर

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून भारतीय प्रशासकीय सेवेत आयएएस अधिकारी म्हणून होतकरू विद्यार्थ्यांची निवड व्हावी व देशाची व जनसामन्यांची प्रामाणिक सेवा त्यांच्या हस्ते व्हावी यासाठी समुत्कर्श संस्था कर्नाटक यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आयएएस अभ्यासक्रमाची ओळख व्हावी व पुढे त्यांच्यासाठी कार्यशाळा शिबीर आयोजित करण्याच्या उद्देशाने शनिवारी दि. ५ ऑगस्ट रोजी ठिक सकाळी १० वाजता खानापूर येथील लोकमान्य सभागृहात व त्याच दिवशी दुपारी एक वाजता ज्ञानेश्वर कल्याण मंटप, बिडी येथे अभिमुखता (प्राथमिक माहिती शिबीर) आयोजित करण्यात आला आहे. खानापूर शहर व तालुक्यातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी व पालक वर्ग यांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेचे चेअरमन व ऍड. चेतन मणेरीकर यांनी रविवारी दि. ३० रोजी स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलमध्ये बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी महेश बिडीकर, ऍड. मदन देशपांडे, शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्वाती वाळवे, समर्थ इंग्रजी स्कूलच्या प्राचार्या सौ. दिव्या नाडगौडा, आनंदगड हायस्कूलच्या उमा घारशी, म. मं. सिध्दीविनायक इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच बी. बी. पुजार आदी उपस्थित होते.

यावेळी महेश बिडीकर, स्वाती वाळवे आदिनी माहिती दिली.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *