खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुका म्हणजे अतिघनदाट जंगलाने व्यापलेला तालुका त्यामुळे वनप्राण्याकडून नेहमीच शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. जंगल भागाबरोबर तालुक्यातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या यडोगा, कुप्पटगिरी, बल्लोगा आदी भागातील उस पिकाचे ही जंगली डुक्कर, गवीरेडे आदी जंगली प्राण्याकडून प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेती करणे नकोसे झाले आहे.
या जंगली प्राण्यांपासून पिकाचे सरंक्षण व्हावे यासाठी हायबॅक (झटका करंट) चा वापर केला जातो. तरी जंगली प्राण्यांकडून पिकाचे नुकसान होतच आहे. तसेच भात पिकाचे नुकसान गवीरेड्याकडून केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच करणे नकोसे झाले आहे.
शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाले तरी नुकसान भरपाई वनखात्याकडून मिळतच नाही. लोकप्रतिनिधीही डोळे झाक करतात. खानापूर आरएफ यांच्याकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरऱ्यांना शेतीच नको अशी वेळ आली आहे.
नुकताच यडोगा, बल्लोगा, कुप्पटगिरी आदी भागातील उस पिकाचे रानडुक्करानी केलेले प्रचंड नुकसान पाहुन शेतकरी हतबल झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta