रामनगर : रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा सांस्कृतिक राष्ट्रीय सेवा योजना घटकाचा उद्घाटन समारंभ व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी या समारंभाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले बापूजी ग्रामीण विकास समितीचे सचिव श्री. मंजुनाथ पवार यांनी आपल्या अमृत हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला चालना दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘शिक्षण ही प्रक्रिया निरंतर वाहत राहणारा वाहणारा झरा असून तिचा पाठलाग करणे हे आपले कर्तव्य आहे. शिक्षण घेत असताना आपण ते मध्यांतरी सोडता कामा नये ते पूर्ण करावे. शिक्षणाचा आवाका मोठा असून ज्या प्रकारामघ्ये आपली आवड आहे ते आपण स्वीकारले पाहिजे. व्यक्तिमत्व विकासाबरोबरच आपण अनेक क्षेत्रातून शिक्षणाने सर्वांगीण विकास साधतो. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले बी.जि.व्हि.एस. स्थळी समितीचे अध्यक्ष श्री. जी. जी. गांधले आणि प्राचार्य श्री. एम. एच. नाईक यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपले मौकिख विचार व्यक्त केले. यावेळी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर स्थळी समितीचे सदस्य श्री. निळू सोलयेकर व पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिल कुमार देवर्षी तसेच महाविद्यालयाचे सर्व अध्यापक वृंद उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे श्री. गांजले ब्रदर्स यांच्यावतीने बारावीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम आणि द्वितीय श्रेणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सत्कार केला जातो तो याही वर्षी संपन्न झाला. कुमारी विजेता हरिजन व कुमारी रिया गावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बारावी कला विभागात समाजशास्र विषयामध्ये महाविद्यालयात सर्वोच्च गुण घेतलेल्या कुमारी दिया दिलीप देसाई हिला शाल भेटवस्तू व रोख रक्कम देऊन अध्यापक श्री राजेश देसाई यानी सत्कार केला. कुमारी गायत्री लोहार आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने केली तर कुमारी आरती गुंजेकर व सहकारी यांनी स्वागत गीत सादर केले. अध्यापक राजेश देसाई यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर अध्यापक श्री. एम. एस. कम्मार यांनी अहवाल वाचन केले. तर शारीरिक शिक्षण अध्यापक श्री. संजय गौडा यांनी बक्षीस व सत्कार समारंभाचे आयोजन केले. राष्ट्रीय सेवा योजनाधिकारी श्री. पी. एस. परब यांनी सूत्रसंचालन केले व श्रीमती भारती कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Belgaum Varta Belgaum Varta