खानापूर : खानापूर शहराच्या हक्केवर असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या नुतन सभागृहाचे उद्घाटन ग्राम पंचायतीचे अध्यक्ष प्रविण अगणोजी यांच्या हस्ते फित कापून नुकताच करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष सौ. रेणूका कुंभार, सदस्य संभाजी पाटील, अशपाक अत्तार, परशराम पाटील, हरिशकुमार शिलवंत, रवी मादार, सदस्या सौ. उज्वला भैरू कुंभार, मेहबूबी शेख, सौ. पार्वती शिंगाडे, सौ. भरमव्वा नाईक, सौ. शोभा शिंगाडे, सौ. जीजा अल्लोळकर, तसेच पीडीओ रेश्माबानू पानीवाले व सेक्रेटरी निखील सोज तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
यावेळी बोलताना ग्राम पंचायतीचे अध्यक्ष प्रविण अगणोजी म्हणाले की, ग्राम पंचायतीच्या वतीने नविन अंगणवाडी, त्याचे रंगकाम, शाळेसाठी डेक्स, जवळपास दहा कुपनिलका, मुडेवाडी शाळा इमारत, फेव्हर्स, डुक्कर वाडी गावासाठी विधुत खांब, हलकर्णी शाळेसाठी स्वयंपाक खोली, सी सी गटार, गांधीनगर शाळेसाठी ध्वजाकट्टा, रंगकाम, ग्रामपंचायत डिजीटल ग्रंथालय, कंप्युटर, आदी विकास कामे केली आहेत.
तर हलकर्णी गावच्या कचरा डेपोसाठी जागा नसल्याने हलकर्णी गावच्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.
खानापूर शहराच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या हलकर्णी ग्रा. पं. चा कचरा पणजी- बेळगाव महावर्गावरील रस्त्याच्या बाजूला असल्याने दुर्गंधीची समस्या जनतेला तसेच प्रवाशाना सतावत आहे. त्यातच १ एकर ३३ गुंठे जमिन गायरान असुन तहसीलदार नावे सात बारा उत्तरा असल्याने तहसीलदार ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी तयार नाही. तर शहराचा कचरा टाकण्यात येणाऱ्या मन्सापूर येथे कचरा टाकण्यास विरोध होत असल्याने महामार्गावरील कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न ग्रामपंचायतीला पडला आहे. याकडे आमदारांनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज आहे, अशी समस्या यावेळी सांगण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. आभार सेक्रेटरी निखील सोज यांनी मानले.