खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बंकीबसरीकट्टी गावातील एका कुटुंबाला एम. के. हुबळी येथे लग्न समारंभात जेवण करून घरी आल्यानंतर रात्री उलटी जुलाब झाल्याने 11 जणांना नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या सर्वाना अन्नातून विषबाधा झालेला होता. यामध्ये तुषार महमद जमादार (वय 12) याचा गुरुवारी मृत्यू झाला.
तो येथील बंकीबसरीकट्टी कन्नड शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. त्याला मुडलगी येथील मुरारजी देसाई वस्ती शाळेत प्रवेश मिळाला होता. पण कोरोना काळात तो जाऊ शकला नाही.
यामध्ये अब्दूल जमादार (वय 70), नमाजबी जमादार (वय 56), महमद जमादार वय (40), सरताज जमादार (वय 35), शहनाज जमादार (वय 32), साहिर जमादार (वय 15), सिमरन जमादार (वय 13), सहना जमादार (वय 8), अल्फिया जमादार (वय 10), अजान जमादार (वय 4) यांच्यावर नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
घटनेची महिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी भेट देऊन सहकार्यासह लक्ष ठेवून आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta