खानापूर : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर लोंढा विभागीय माध्यमिक विद्यालय क्रीडा स्पर्धा मंगळवारी दि ८ रोजी संपन्न झाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी हायस्कूलचे एसडीएमसी अध्यक्ष मारूती जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, पीकेपीएस सोसायटीचे संचालक हरिहर बिर्जे, सुभाष घाडी, किशोर हेब्बाळकर तसेच क्रीडा स्पर्धेसाठी मदत केलेल्या दानशूर व्यक्ती, आदी उपस्थित होते.
यावेळी गुंजी सरकारी मराठी हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एन. उत्तुरकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देईन स्वागत केले. त्यानंतर क्रीडा स्पर्धा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. तर अध्यक्षांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. तर ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष गुरव याच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धा चा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष गुरव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबरच खेळात ही भाग घेऊन शाळेचे व गावचे नाव उज्वल करावे. असे आवाहन केले. तसेच पत्रकार रावजी बिर्जे यानी ही खेळाडुंना मार्गदर्शन केले.
किशोर हेब्बाळकर यांनीही खेळाडुंना मार्गदर्शन करत टी -शर्ट व पॅन्ट देणगी दाखल दिल्या.
शेवटी अध्यक्षीय भाषणात मारूती जाधव म्हणाले खेळाडुंनी आपल्या गुणांचे प्रदर्शन करून यश मिळवावे. तसेच क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वानी सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमासाठी संतोष गुरव, अमोल बेळगांवकर, सुभाष घाडी, मारूती जाधव, कुतुबुद्दीन बिच्चनावर, आदीनी क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी आर्थिक देणग्या जाहीर केल्या.
तसेच गुंजी येथील सोशल फाऊंडेशन यांच्यावतीने खेळांडूना मेडल्स देऊन सहकार्य केले.
यावेळी लोंढा विभागीय माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, गावचे शिक्षण प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक जाधव यांनी केेले. तर आभार क्रीडा शिक्षक जी. आर. पावसकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta