खानापूर : खानापूर तालुक्यातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी ९२ हजार मताधिक्यानी विजय प्राप्त करून खानापूरात इतिहास घडविला. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या मागण्या वाढल्या, समस्या सोडविण्यासाठी खास आमदार कार्यालयाची मागणी सातत्याने होत असल्याने खानापूर शहरातील शिवाजी नगरात देवराज अर्स कृषी कार्यालयाच्या इमारतीत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या आमदार संपर्क कार्यालयाचे उदघाटन गुरूवारी पार पडले.
यावेळी परम पूज्य चन्नबसव देवरू यांच्या सान्निध्यात कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजपचे नेते बाबूराव देसाई, राजेंद्र रायका, किरण यळ्ळुरकर, लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते गो मातेचे पुजन करून नुतन कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी वास्तुशांती व देवतांचे पुजन परम पूज्य चन्नबसव देवरू यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, तालुक्याच्या ठिकाणी आमदार कार्यालयाची मागणी सातत्याने होत असल्याने तीन महिन्यात आमदार कार्यालय शिवाजी नगरातील देवराज अर्स कृषी कार्यालयाच्या इमारतीत उभारण्यात आले.
याठिकाणी तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यात येतील. सरकारी कामकाजाची माहिती याठिकाणी मिळेल. भाजप पक्षाचे नेते मंडळी याठिकाणी असतील. लोकांच्या समस्या, अडचणी एकूण घेण्यासाठी दिवस व वेळ याचे वेळापत्रक देऊन याठिकाणी आमदाराचा पी. ए. उपस्थित राहतील. किवा भाजपचे नेते मंडळी असतील याच्याकडे तालुक्यातील समस्या, जनतेच्या समस्या यावर निरसन करण्यात येतील, अशी माहिती यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली.
यावेळी तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, प. पू. चन्नबसव देवरू आदींनी विचार मांडले.
यावेळी उपस्थित मान्यवराचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपचे नेते बाळू सावंत, वसंत देसाई, विजय कामत, बाबा देसाई, प्रकाश निलजकर, लक्ष्मण बामणे, बसु सानिकोप, जाॅर्ज गोन्सालवीस, राजू सिध्दाणी, शंकर पाटील, विनायक मुतगेकर, भरमाणी पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे चांगाप्पा निलजकर, विठ्ठलराव करंबळकर, यल्लापा तिरवीर, जनरल मॅनेजर तुकाराम हूंदरे. आदी शेकडो भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक मल्लापा मारीहाळ यांनी केले. आभार लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta