खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले (कौंदल) यांच्या वतीने ग्रामपंचायतीचे नुतन अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्षा सौ. सुनंदा यल्लापा इरगार तसेच माजी अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष नारायण पाटील यांचा सत्कार सोहळा सोमवारी दि. १६ रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला.
यावेळी प्रास्ताविक सेक्रेटरी मारूती पाटील यांनी केले.
तर ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले (कौंदल) यांनी स्वागत करून नुतन अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्ष सौ. सुनंदा इरगार, तसेच माजी अध्यक्ष सौ. लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष नारायण पाटील यांचा शाल, पुष्पहार, व श्रीफळ देऊन सत्कार केला
यावेळी बोलताना उदय भोसले म्हणाले की, २०२४ सालात करंबळ गावची ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा भरणार आहे.
तेव्हा नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मोठी जबाबदारी घेऊन करंबळ, जळगे,कौदल, रूमेवाडी गावात रस्ते, गटारी, पाण्याचे पाणी, पथदिवे, इतर विकासकामे पूर्ण करावी. जत्रेसाठी कामाचा विकास करावा, असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी विकास कामे करण्याबद्दल मत व्यक्त केले. तसेच पुंडलिक पाटील, व इतर मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी ग्राम पंचायत पीडीओ एस डी मड्डी, सेक्रेटरी मारूती पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य, सदस्या, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सेक्रेटरी मारूती पाटील यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta