खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी तसेच करंजाळ येथे दोन ठिकाणी एकाच दिवशी घरपोडी करून पाच तोळे दागिन्यासह तीस तोळे चांदीसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. दोन्ही घराचे दरवाजे समोरून कुलूप तोडून चोरट्याने घरातील तिजोरी निकामी करून त्यातील सदर ऐवज लांबविला असून याप्रकरणी नंदगड पोलीसात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
याबाबत माहिती की, शिंपेवाडी येथील सुरेश जयराम पाटील हे आपला घरचा दरवाजा लावून शेताकडे गेले होते. दुपारच्या दरम्यान समोरील दरवाजा तोडून कपाटातील 4 तोळे सोन्याचे दागिने 25 तोळे चांदीसह 14 हजार रुपये रक्कम लांबवली आहे. त्याच्या काही वेळातच जवळच असलेल्या करंजाळ गावातही घरफोडी पुढे झाली. या ठिकाणी परशराम गणेश लकेबैलकर यांच्याही घराचा बंद दरवाजा तोडून चोरट्याने कपाटातील 1 तोळा सोन्याचे दागिने 5 तोळे चांदीसह 4 हजार रुपये रक्कम लांबवले आहे. तेथेच आणखी एक घर म्हातरु गणेश लकेबैलकर यांचीही घर तोडले असून केवळ कुलूप तोडला असल्याचे निदर्शनास आले. सदर चोरीचा प्रकार एकाच टोळक्याने केल्याचा दाट संशय व्यक्त निर्माण झाला असून नंदगड पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकालाही पाचारण केले. मात्र पूरक सुगावा लागला नसल्याचे दिसून आले. या चोरी प्रकरणामुळे त्या भागातील नागरिकात घबराट पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta