खानापूर : खानापूर शहरातील श्री राजा शिवछत्रपती स्मारक यांच्यावतीने सोमवारी दि. २८ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने खानापूर तालुक्यातील सन २०२३ सालातील दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवतेसह उत्तीर्ण झालेल्या व गरीब, होतकरू, अनाथ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवस्मारक अध्यक्ष एम. पी. पाटील उपस्थित राहतील. तर विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार दिगंबर पाटील प्रमुख म्हणून उपस्थित राहतील.
तर प्रमुख वक्त्या म्हणून आर पी डी काॅलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. संध्या देशपांडे या उपस्थित राहतील.
तरी कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थ्यानी व पालकांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन श्री राजा शिवछत्रपती स्मारक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta