खानापूर : खानापूर शहरातील सर्वोदय शाळेच्या पटांगणावर झालेल्या खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक तसेच मुलींच्या संघानेही थ्रो बाॅल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एकंदरीत मुलांच्या संघाने सतत पाचव्यांदा व मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवत थ्रो बॉल क्रीडा प्रकारातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात उपविजेत्या मीलाग्रेस चर्च शाळेचा 2-0 ने पराभव केला तर मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात प्रभुनगर शाळेचा 2-0 ने पराभव केला. या यशाबद्दल तालुक्यातून अबनाळी शाळेचे विशेष कौतुक होत आहे. या विजयी खेळाडूचे खानापूर तालुक्याच्या बीईओ राजेश्वरी कुडची, बीआरसी अधिकारी ए आर अंबगी, तालुका क्रीडाधिकारी सुरेखा मिरजी, तालुका अक्षरदासोह अधिकारी महेश परिट, शिरोली केंद्रप्रमुख बी ए देसाई आदीनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुरव, सहशिक्षक रमेश कवळेकर, विजय पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर डिगेकर, उपाध्यक्षा सपना गावकर यांनी अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta